Nasa Open Door For Travellers आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानाकाचे दरवाजे पर्यटकांसाठी खुले?

     आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय नासा कडून घेण्यात आला. पर्यटन केंद्र २०२० पासून सुरु करण्यात येईल.

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय नासा कडून घेण्यात आला. पर्यटन केंद्र २०२० पासून सुरु करण्यात येणार असून, या अवकाश स्थानकावर एक रात्र घालवण्यासाठी तब्बल ३५ हजार डॉलर इतका खर्च येईल,अशी माहिती नासाचे प्रमुख अधिकारी जेफ…. यांनी शुक्रवारी दिली.

संशोद्नाशिवाय आता पर्यटन आणि व्यावसाहिक उपकरणांसाठी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानके खुले होतील.२०२० नंतर वर्षातून कमीत कमी दोन वेळा अवकाश स्थानकावर पर्यटकांना घेऊन जाण्याचा आणि ३० दिवस एका अवकाश स्थानाकावर राहण्याची सोय केली जाईल. एकावेळी १२ पर्यटकांना अवकाश स्थानकावर जात येईल, असे नासाचे उपसंचालक रॉबिन ….. यांनी सांगितले.

नासाकडून ‘एलन मस्क’ची ‘स्पेस एक्स’ आणि ‘बोइंग’ या दोनच कंपन्या सध्या अंतराळ पर्यटनावर काम करत आहेत. यासाठी एक विशेष वाहनही तयार करण्याची योजना आहे. या वाहनासाठी ‘स्पेस एक्स’चे ‘क्रू ड्रॅगन कॅप्सूल’ आणि ‘बोइंग’चे ‘स्टारलाइनर स्पेसक्राफ्ट’ या दोन अंतराळयानांचा वापर केला जाणार आहे. या दोन कंपन्या एक स्पर्धा आयोजित करून पर्यटकांची निवड करणार असून, अवकाश स्थानकांवर जाऊन परत येण्यासाठी ५.८ कोटी डॉलर इतका खर्च अपेक्षित आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *